
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे-काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील
राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्यांना नौदलापर्यंत कोणी पोहोचवले, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम केले आहे.या उलट शासनाने झालेली चूक मान्य करणे गरजेचे आहे. या सगळ्याला विद्यमान महायुतीचे शासन जबाबदार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. किंबहुना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी येथे व्यक्त केले.राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी भेट देत पाहणी केली.