
अखिल शिक्षक संघाकडून कर्तव्यावरील शिक्षकांना मोफत औषध वाटप
दापोलीकोरोना संसर्गाविरोधात सर्वांचीच लढाई सुरू आहे. या लढाईत शिक्षकसुध्दा सहभागी आहेत. पोलिस मित्र, रेशन दुकानावर रूट नॉमिनी ऑफिसर, कंटेन्मेंट झोन सर्वेक्षण, क्वारंटाईन कक्ष नियंत्रक, भाजी मंडईवर नियंत्रण ठेवणे अशा विविध कर्तव्यावर शिक्षक काम करत आहेत. कर्तव्यावर असलेल्या तालुक्यातील शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोफत होमिओप@थिक औषधे वाटप करून अखिल शिक्षक संघ शाखा दापोलीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोविड 19 च्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अर्सेनिक अल्बम 30 च्या औषधांचा वापर केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे नमुद केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने कोविड-19 वर आयुर्वेद, होमिओप@थी शाखेतील उपचारांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे. त्यामुळे अखिल शिक्षक संघ दापोलीच्या वतीने तालुक्यातील कर्तव्यावर असणार्या सर्व शिक्षकांना या होमिओप@थी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या गोळ्यांचा तालुक्यातील जवळपास ७००शिक्षकांना लाभ होणार आहे.
www.konkantoday.com