
लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार,मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत.
मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत करता येईल असं तुम्हाला कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, ही कल्पना नसून भविष्यात असा रॉकेटसारखा सुपर फास्ट प्रवास करणे शक्य होणार आहे.लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही ट्रेन 1200 च्या स्पीडने धावणार आहे.भारतीय रेल्वे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. दळणवळणाचे जलद आणि सुखद माध्यम असल्याने लाखो लोक रेल्वेने प्रवास करत. रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. यानंतर आत लवकरच हायपरलूप ट्रेनमधून विमानापेक्षा सुपफास्ट प्रवास करता येणार आहे. हायपरलूप ट्रेनच्या चाचणीसाठी भारतात 410 किमीचा ट्रॅक तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.