..तर विरोधकांना विधानसभेत प्रवेश नाही

मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला.त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कृतीची खिल्ली उडवत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले. ते शनिवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचं हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो.

विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचं हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button