डी मार्ट समोरील मिऱ्या नागपूर महामार्गावर सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गळती.

रत्नागिरी शहराजवळील टीआरपी जवळ असलेल्या डी मार्ट समोर शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खूप मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला लोक जमा झाले. त्यावेळी डी मार्ट समोरील मिऱ्या नागपूर महामार्गावर सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकर मधून जोरजोरात वायू गळती होत असल्याचे दिसून आलं.महानगर गॅस एजन्सीच्या सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकर मधील एक सिलेंडरचा व्हॉल्व ल गळती असल्याचे चालकाच्या लक्षात आलं. त्यानं डी मार्ट समोरील रस्त्यावर टँकर थांबवून सिलेंडर सिलेंडर वेगळा केला आणि त्यातील गॅस बाहेर हवेत सोडून दिला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.मात्र यामुळे कुवारबाव कडून रत्नागिरीकडे येणारी आणि रत्नागिरी कडून कुवरबाव कडे जाणारे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button