
खेडमध्ये ५९२ दिव्यांगांचीच शासन दफ्तरी अधिकृत नोंद, अनेकांची नोंद नाही.
खेड तालुक्यातील ८ आरोग्य केंद्राच्या ४८ उपकेंद्रांतर्गत १ हजार ८३३ दिव्यांग आहेत. या आकडेवारीपैकी केवळ ५९२ दिव्यांगांचीच शासन दफ्तरी नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित दिव्यांगांची प्रमाणपत्राअभावी शासकीय पटलावर नोंदच नसल्याने हे दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत. शासकीय यंत्रणेच्या अनास्थेचा उर्वरित दिव्यांगांना फटका बसत आहे. या वंचित घटकापर्यंत शासकीय अधिकारी पोहोचणार तरी कधी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. www.konkantoday.com