क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीकडून अनिरूद्ध शेखर निकमचा गौरव
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्लीन्सलँडच्या गुरूवारी झालेल्या सोहळ्यात हॉर्टीकल्चरमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या सावर्डे येथील अनिरूद्ध निकम याला पदवी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर शैक्षणिक कालावधीत शैक्षणिक आणि संशोधन कार्याची एकूणच कार्यक्षमता याचे अवलोकन करत युनिर्व्हसिटीकडून दिल्या जाणारा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. आमदार शेखर निकम कुटुंबिय या सोहळ्याला उपस्थित होते. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरूद्ध यान ऑगस्ट २०२४ मध्ये हॉर्टिकल्चरमध्ये पदव्युत्तर शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड येथून पूर्ण केले.
अनिरूद्धने जुलै २०२२ पासून ऑस्ट्रेलियन ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि हार्ट इनोव्हेशन यांच्यासोबत प्रोजेक्टरवरही काम केले आहे. आपण यापुढे कृषी व औद्योगिक क्षेत्रात काम करणार असल्याचे अनिरूद्धने सांगितले. www.konkantoday.com