लाडक्या बहिणींच्या निकषांची पडताळणी होणार
महाराष्ट्र राज्याने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली. आता ही रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्यात येणार असल्याची जरी शासनाकडून घोषणा झाली असली तरी अजून जिल्हास्तरावर त्या कार्यवाहीबाबत प्रतीक्षा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नव्याने जाहीर केलेल्या निकषांतून सामोरे जावे लागणार, यामुळे या बहिणींमध्ये काहीशी चलबिचल सुरू आहे.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे, हा आहे. सुरूवातीला या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयाची आर्थिक मदत दिली जात होती. आता ही रक्कम वाढवून २,१०० रुपये करण्यात येणार आहे.www.konkantoday.com