राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडल्याने खळबळ.
संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. त्यातच राज्यसभेत मोठी खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे.
काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांना अलॉट केलेल्या बाकावर हे नोटांचे बंडल मिळाले आहे. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज थांबविल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिल्याचे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले. यामुळे मोठा गोंधळ सुरु झाला आहे. हा गंभीर प्रकार असून याची चौकशी केली जात असल्याचे धनखड यांनी सभागृहात जाहीर केले.
सीट नंबर 222 वर हा पैसा सापडला आहे. ही सीट तेलंगानाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.