
सिंधुदुर्गात वन विभागकडून बांदा शहरात 16 माकडे जेरबंद
वनविभागाच्या जलद कृती दलामार्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा शहरातील आंगडीवाडी येथे 16 माकड पकडण्यात आली. माकडांपासून शेती बागायतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उबाठा बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांना शहरातील माकडांचा बंदोबस्त करणेबाबत निवेदन दिले होते.त्यानुसार ही माकड पकड मोहीम राबविण्यात आली.
पुढील दोन दिवस बांदा शहर व परिसरात देखील माकड पकड मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. काणेकर यांनी दिली.शुक्रवारी दिवसभर शहरात ही माकड पकड मोहीम राबविण्यात आली. आंगडीवाडी येथील 16 माकडांना वनविभागाच्या जलद कृती दलाने जेरबंद केले