बेकायदेशीर गुटखा, पान मसाला, आर एम डी बाळगणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड.
राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरात बेकायदेशीर गुटखा, पान मसाला, आर एम डी बाळगणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अशा प्रकारे अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी इक्बाल मजिद देवानी रा. पाचल या व्यापाऱ्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असून गेली अनेक वर्षे हा व्यापारी पाचल परिसरात अनिधकृतपणे हा गुटखा व्यवसाय करत असून त्याचे समुळे उच्चाटन आता पोलीसांनी करावे अशी मागणी पाचल भागातील जनतेतुन होत आहे.