जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातीलदोघा भावांना पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील आकेरी-गावडेवाडी येथील आरोपी लक्ष्मण मधुकर नाईक (वय ४०), परशुराम मधुकर नाईक (वय ३३) या दोघा भावांना पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी गुरुवारी ठोठावली.
या शिक्षेत भादवी कलम ५०७ अन्वये प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये दंड तसेच भादवी कलम ५४ नुसार प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड तर भादवी कलम ५०६ अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.