
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू विघ्नहर्ता मंदिराच्या कलशाचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले
कोराेनाच्या पाश्र्वभूमीवर गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते
अंगारकी निमित्ताने हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू विघ्नहर्ता मंदिराच्या कलशाचे दर्शन घेतले.
तब्बल १९ महिन्यानंतर दि. २ मार्चला अंगारकीचा योग आला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा सुरू झाल्याने देवस्थान समिती पदाधिकार्यांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मोरया चौकातील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. तरीही सांगली, सातारा, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर आदी भागातील भाविक सोमवारी रात्री गणपतीपुळे येथे दाखल झाले होते.
www.konkantoday.com