आयोगाला माहिती न दिल्याने रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही महिन्यांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणार्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. मात्र राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारणारी कारणे दाखवा, नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. त्यात रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन) काही महिन्यांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणार्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. मात्र राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारणारी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.www.konkantoday.com