आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार.
आता सोलापुरातील मारकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. हा लाँग मार्च ईव्हीएम विरोधात असणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.
ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्नया आंदोलनावेळी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतूनलॉन्ग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी या ठिकाणी ईव्हीएमविरोधात पडलेली ठिणगी देशभर वनवाढ पेटवेल, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.