अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला अटक.
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक केली आहे. गणेश आनंदा जाधव (२४, रा. केर्ले, ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.