संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू


संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने बुधवारी अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मनोहर आत्माराम मेस्त्री (70, रा. सांगवे वरचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.अपघाात प्रकरणी बोलेरो गाडीच्या चालकावर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची खबर ओम रामकृष्ण मेस्त्री (रा. सांगवे वरचीवाडी, 20 वर्षे) याने दिली आहे. ओम मेस्त्री हा आपल्या ताब्यातील हीरो होंडा स्प्लेंडर (एमएच 05, एए 9486) या दुचाकीवरून त्याचे काका मनोहर मेस्त्री यांना कोसुंबहून साडवलीच्या दिशेने घेवून येत होता. याचवेळी प्रतिक नरेश शिंदे (25 वर्षे, रा. मुंबई) हा आपल्या ताब्यातील महेंद्रा कंपनीची बोलेरो (एमएच 01 इजे 4606) घेवून संगमेश्वरहून देवरुखच्या दिशेने येत होता. वनाज कंपनीजवळ तुळजा भवानी नगर येथे प्रतिक शिंदे हा ओम मेस्त्रीच्या दुचाकीला ओव्हरटेक करत होता. यावेळी प्रतिक शिंदे याचे बोलेरोवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोची ओमच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवर मागे बसलेल्या मनोहर मेस्त्री यांना यावेळी गंभीर दुखापत झाली. हा अपघात 31 रोजी सकाळी 10 वाजता घडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button