दुचाकीने भारत भ्रमण करणारे मंडणगडचे दांपत्य ८ डिसेंबरला परतणार.
दुचाकीवरून भारत भ्रमण करणारे म्हाप्रळ येथील सम्राट व वर्षा डंबे ८ डिसेंबर रोजी आपला साहसी प्रवास आटपून गावी परतणार असल्याची माहिती वडील डॉ. उल्हास डंबे यांनी दिली आहे. यामुळे त्यांच्या घर वापसीची तालुकावासियांना उत्सुकता लागून राहिली आहे.सम्राट आणि वर्षा यांची आर्ट इंडिया राईड म्हणजे साहस, देशभक्ती आणि सांस्कृतिक शोधाची भावना व्यक्त करणारा एक अविश्वसनीय प्रवास आहे.
त्यांच्या प्रवासाचे वर्णन करावयाचे झाल्यास ७९ दिवसांचा, १५,००० कि.मी.चा भारताच्या सीमांचा शोध घेणारा प्रवास असे वर्णन करावे लागेल. दोघांनी २० सप्टेंबर २०२४ रोजी सुरू केलेला प्रवास ८ डिसेंबरला संपणार आहे. www.konkantoday.com