
जयस्तंभावरील धोकादायक होर्डिंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रत्नागिरी शहरात गजबजलेल्या अशा जयस्तंभ चौकातील कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याकडील होर्डिंग पावसाळी वार्यामुळे धोकादायक स्थितीत आहे.हे होर्डिंग कधीही कोसळू शकेल अशा अवस्थेत आहे.हे होर्डिंग ज्या रोडवर आहे त्या रोडवर मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी ये जा करतात त्यामुळे जर हे होर्डिंग कोसळले तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याच भागात जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी नगरपालिका, तसेच आमदार उदय सामंत यांचे कार्यालय आहे. मात्र अजूनही प्रशासनाच्यावतीने यांच्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.
www.konkantoday.com