रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर संपन्नउदय सामंत प्रतिष्ठान, मराठी पत्रकार परिषदेचा संयुक्त उपक्रम.
रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील रक्तपेढीत बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.जिल्हा शासकीय रुग्णालयात सतत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात रक्तपुरवठा कमी पडू नये याकरिता सामाजिक दायित्वातून मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील रक्तपेढीत बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रत्नागिरी तालुक्यातील पत्रकारांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिराला वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डॉ. रामा भोसले, सीएस भास्कर जगताप, डॉ. ऋषिकेश पवार, डॉ. कृणाल भोईर आणि इतर कर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उदय सामंत प्रतिष्ठानचे महेश सामंत, सागर भिंगार्डे तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.