रत्नागिरी येथे युवा महोत्सव उत्साहात संपन्न

रत्नागिरी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2024-25 शनिवार दि. 30 रोजी उत्साहात संपन्न झाला. युवकांचा सर्वांगीण विकास, परंपरा जतन करणे, कलागुणांना वाव देणे यासाठी जिल्हा, विभाग, राज्य, व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, श्री.सागर पाटील यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नेहरू युवा केंद्राचे मोहितकुमार सैनी, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, अक्षय मारकड, गणेश जगताप, श्री.गणेश खैरमोडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक रत्नागिरीचे प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले. तसेच नेहरू युवा केंद्राचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री.मोहितकुमार सैनी यांनी कलेला फक्त कलेशी सिमित न ठेवता त्याच्याकडे करिअर म्हणून बघण्याबाबत व तशी वाटचाल सुरू ठेवण्याबाबतचे मार्गदर्शन केले. शुभांगी साठे यांनी देखिल युवकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणेबाबत तसेच कला गुणांचा आपल्या जिवनात कसा उपयोग होतो याबाबत आपले मनोगत व्यक्त करून युवकांना प्रोत्साहीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ऋतिक चव्हाण यांनी केले तसेच श्री.गणेश खैरमोडे यांनी उद्धाटन सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर करून आभार प्रदर्शन व्यक्त केले.

यावेळी विज्ञान प्रदर्शन, लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, कवितालेखन, चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा, हस्तकला, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रोडक्ट या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे केलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. प्रत्येक स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त विजेत्यांना पारितोषिक रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button