रत्नागिरी जिल्ह्यातील बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत असलेल्या बांग्लादेशी, रोहिंग्या, नेपाळी नागरिकांवर प्रशासनाच्यावतीने तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील बांधकाम, मच्छिमारी बोटी, औद्योगिक आस्थापना, चिरेखाणी, अनधिकृतरित्या सुरू असलेले वाळू उत्खनन, बोटी अदींवर बांग्लादेशी, रोहिंगे, नेपाळी नागरिक कार्यरत आहेत.
पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनधिकृतरित्या कार्यरत असलेले बांग्लादेशी नागरिक सापडले आहेत.जिल्हा प्रशासनाने तात्काळ अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या बांग्लादेशी, नेपाळी नागरिकांना मदत करणार्यांना जरब बसावी, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस महेंद्र गुडेकर, सुनिल साळवी, सचिन शिंदे, सतिश खामकर, रूपेश चव्हाण, विधानसभा अध्यक्ष सुनिल साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. www.konkantoday.com