
पाली बाजारपेठेतील जलवाहिनी फुटून पाणी पुरवठा बंद,आठ दिवस उलटूनही दुरुस्ती नाही
रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे कामयुध्दपातळीवर सुरु आहे. हे काम सुरु असताना पाली
बाजारपेठेतील जलवाहिनी फुटूनपाणी पुरवठा बंद झाला आहे.जुन्यामहामार्गा जवळ असलेली ग्रामपंचायतीची शासकीय पाणीयोजना जलवाहिनी स्थलांतरीत केलेली नसल्याने हा गोंधळनिर्माण झालेला आहे. याबाबत पाली पंचक्रोशीतून तिव्र नाराजी
व्यक्त केली जात आहे.पाली बाजार पेठेत महामार्ग चौपदरीकरणाची ठेकेदाराकडूनअद्यापही भुसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ठेकेदाराने गेल्याआठवड्यापासून पाली बाजार पेठच्या दोन्ही भागात रस्त्यालगत मातीचा भराव आणून सपाटीकरण करण्याचे काम सुरु केलेआहे. त्यामुळे पाणी योजनेची जलवाहिनी फुटली आणि पाणीपुरवठा बंद झाला. याला आठ दिवस झाले तरीही अजुन त्याचीदुरुस्ती करण्यात आलेली नाही.
www.konkantoday.com