मी त्यांचा पुन्हा बदला घेणार- देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 2022 साली महाराष्ट्रात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते की, आपल्यावर टोकाची टीका केली, बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार आहे.

त्यांना माफ केले हाच आपला बदला आहे. असे वक्तव्य केले होते.या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना यंदा देखील विरोधकांनी आपली भरपूर बदनामी केली. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर “मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला”, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button