फोंडा घाटातील टँकरच्या अपघाताच्या त्या घटनेत एकाचा आगीत होरपळून मृत्यू.
सांगली-मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेवून येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर फोंडाघाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. त्यातील इंधनाला आग लागून भडका उडाला. घटनेत एक व्यक्ती आगीच्या ज्वाळामुळे होरपळल्याने मृत्युमुखी पडली आहे. ही घटना बुधवारी घडली. मृताचे नाव समजू शकले नाही.फोंडाघाटात अवघड वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरमधील इंधनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली,कुडाळ येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. एका व्यक्तीचा आगीत होरपळलेल्या स्थितीत मृतदेह मिळाला असून तो कोणाचा आहे? याबाबतही शोध घेण्यात येत होता. त्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.