नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे भव्य स्क्रीनवर दिसणार, जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर भाजप कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे आज रत्नागिरी मधील मारुती मंदिर येथे जोरदार जल्लोष करणार आहेत आज सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत.अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निमित्ताने राज्याच्या भाजप कार्यकर्त्यानी आज हा आनंद एकत्रित साजरा करण्याचे ठरवले आहे.
हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी मारुती मंदिर येथे जय्यत तयारी सह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हावे जिल्हा उपाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, जिल्हा चिटणीस सचिन करमरकर आणि जिल्हा चिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.