चिपळुणात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी.
चिपळूण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने दहशत निर्माण केली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील तहसिल कार्यालयाशेजारी असणार्या साकेत अपार्टमेंटच्या आवारात एका ५ वर्षीय बालकावर या कुत्र्यानी हल्ला केयाची दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्यात तो बालक जखमी झाला.धनुष चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. घरातून बाहेर पडलेल्या धनुषवर ३-४ भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्याच्या हाताला, मांडीला, कमरेला ठिकठिकाणी चावे घेतले. त्याच्या ओरडण्याने काही लोक जमा झाले आणि त्या कुत्र्यांना पिटाळून लावले. यानंतर धनुषला कामथे रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. www.konkantoday.com