आता शिंदे कधीच या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत-संजय राऊत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा होता. भाजपला गरज होती, आता ती पूर्ण झाली आहे. आता ते फेकले गेले आहेत. आता शिंदे कधीच या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. हे लोक शिंदे यांचा पक्षही फोडू शकतात, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय.संजय राऊत म्हणाले की, ज्यांच्यासोबत काम करतात त्यांचा पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती नेहमीच राहिली आहे.
आजपासून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत असूनही त्यांना 15 दिवस सरकार स्थापन करता आलेले नाही. म्हणजे पक्षांतर्गत किंवा महायुतीत काहीतरी गडबड आहे. उद्यापासून ही अडचण आपल्याला दिसेल. ते महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हितासाठी काम करत नाहीत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.