अजितदादांचा असाही विक्रम; सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार एकमेव नेते ठरणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे गुरुवारी (5 डिसेंबर) सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरणार आहेत.

अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पण जलसंपदा मंत्री असताना त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.

2019 च्या नोव्हेंबर महिन्यात अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. पुढे तीनच दिवसात त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यांतर जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिंदे सरकारमध्येही ते उपमुख्यमंत्री होते. आता गुरुवारी पुन्हा एकदा ते महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.

नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014सन 2019 : पहाटेचा शपथविधी, 23 ते 26 नोव्हेंबर 2019डिसेंबर 2019 ते जून 2022जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024डिसेंबर 2024 पासून पुढे कायमदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फार वेळ नसल्याने सुरुवातीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असे सांगितले जात होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, तसेच सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, या तिघांव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा शपथविधी होणार आहे. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीतील घटक पक्षांचे किती मंत्री शपथ घेतील हे देखील समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे 12, शिवसेनेचे 7 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 7 असे एकूण 26 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button