
स्वराभिषेक संस्थेच्यावतीने रत्नागिरीत ८ डिसेंबरला नाट्यगीत गायन स्पर्धा
प.पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ व स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित गंधर्वरत्न आनंद प्रभूदेसाई नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. थिबा पॅलेसजवळील गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर ही स्पर्धा रंगणार आहे.ही स्पर्धा १२ वर्षावरील सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणीच्यावेळी कोणत्याही २ नाट्यगीतांची यादी त्याच्या स्केलसह अमित भागवत यांच्याकडे पाठवावी. यातील परीक्षक सांगतील ते एक नाट्यगीत सादर करावे लागेल.
८ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून रिपोर्टींग करायचे आहे. स्पर्धा ठीक ४.०० वाजता सुरू होईल. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २ हजार रुपये व २ उत्तेजनार्थ क्रमाकांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क अमित भागवत, क्वालिटी स्क्रीन, एमआयडीसी रत्नागिरी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. www.konkantoday.com