यंदा आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्ततेची ग्रामस्थांना प्रतीक्षा.
केंद्र शासनाने पंचवार्षिक योजनेच्या धर्तीवर हाती घेतलेल्या आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे iकाम यंदाच्या बांधकाम हंगामात तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न मंडणगड तालुकावासियांना पडला आहे. विद्यमान ठेकेदाराची गेल्या वर्षी नियुक्ती झाल्यापासून रस्त्याचे काम जोरात सुरू झाले असले तरी स्थानिकांच्या सूचनांसह ते यंदा पूर्ण होईल का याबाबत तालुकावासियांना शंका आहे.२०१६ साली सुरू झालेल्या आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ कि.मी. मार्गाचे नुतनीकरण होत आहे. मात्र विलंबामुळे हे काम बहुचर्चित झाले.
अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पामुळे मार्गाच्या अंतरातील परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनासह दळणवळणासाठी मार्ग महत्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी व लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेवून महामार्ग प्राधिकरणाने काम करावे यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत. www.konkantoday.com