बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर नव्हे, विष पीत आहात तुम्ही! FSSAI नं घेतला मोठा निर्णय

L ट्रेन, बस प्रवासादरम्यान किंवा अनेक वेळा आपण घेत असलेले मिनरल वॉटर किंवा पॅकेज्ड ड्रिंकिंग आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सोमवारी एक मोठे पाऊल उचलत पॅकेज्ड ड्रिंकिंग आणि मिनरल वॉटरचा ‘हाय रिस्क फूड कॅटेगरी’मध्ये समावेश केला आहे. आता त्यांची सक्तीची तपासणी आणि थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केंद्र सरकारने काढून टाकल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

एफएसएसएआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, आता सर्व पॅकेज्ड पेय आणि मिनरल वॉटर उत्पादकांना वार्षिक तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. कंपनीला परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी केली जाईल.एफएसएसएआयच्या आदेशानुसार, पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यासह उच्च जोखमीच्या अन्न श्रेणीतील व्यवसायांना एफएसएसएआयने मंजूर केलेल्या तृतीय-पक्ष अन्न सुरक्षा एजन्सीद्वारे वार्षिक लेखापरीक्षण करावे लागेल. या उत्पादनांची सुरक्षा आणि गुणवत्ता मानके सुधारणे हा सरकारचा उद्देश आहे जेणेकरून ग्राहकांना सुरक्षित वस्तू उपलब्ध होऊ शकेल.पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या उद्योगाने यापूर्वी सरकारकडे नियम सुलभ करण्याची मागणी केली होती.

बीआयएस आणि एफएसएसएआय या दोघांनाही दुहेरी प्रमाणपत्राची आवश्यकता काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की नवीन नियमांमुळे अनुपालन प्रक्रिया सुरळीत होण्यास आणि उत्पादकांवरील भार कमी होण्यास मदत होईल.

याचबरोबर बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या पाण्य़ाच्या बाटलीवर BIS मार्क असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पॅकेज्ड पाण्याचे यूनिट सुरू करण्यासाठी आधी FSSAI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र निश्चित करते की, पॅकेज्ड पाणी पिण्या योग्य आहे.पॅकेज्ड पाण्याच्या यूनिटमध्ये पाणी फिल्टर करून स्वच्छ केले जाते व त्यामध्ये यामध्ये आवश्यक खनिजे मिसळली जातात. प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात, यामुळे पॅकेज्ड पाण्याचे यूनिटला हे निश्चित करावे लागते की, त्यांचे पाणी पिण्यायोग्य आणि सुरक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button