दानशूर मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी कुमारी ऋतुजा गुरव ला दिला मदतीचा हात..
हातखंबा गुरव वाडी मधील व गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणारी कुमारी ऋतुजा प्रकाश गुरव हिने महाविद्यालयाकडून पॉवर लिफ्टिंग या खेळामध्ये भाग घेतला तीने युनिव्हर्सिटी मध्ये नेत्रदीपक यश मिळवले आता तिला ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग साठी खेळायचे आहे. त्यात घरची परिस्थिती बेताची, वडील भाजप चे बूथ अध्यक्ष म्हणून काम करीत होते परंतु कोरोनाच्या महामारीत त्यांचे निधन झाले..अशा कुटुंबातून एक मुलगी पॉवर लिफ्टिंग साठी आपले प्रविण्य दाखवीत आहे, मेहनत घेत आहे , तिला मुंबई येथे होणाऱ्या निवड चाचणी साठी आर्थिक मदतीची गरज आहे हे मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेबांना समजताच तात्काळ स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन मार्फत ऋतुजा गुरव हिला आवश्यक असणारे रोख रुपये 40,000/- ( चाळीस हजार) ची मदत करण्यात आली.
ही मदत तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे, सरचिटणीस सुशांत पाटकर, सरचिटणीस उमेश देसाई, सरचिटणीस महेश खानविलकर, शक्ती केंद्र प्रमुख संतोष गुरव यांच्या हस्ते व यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
यावेळी संवेदनशील नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब असे बोलून चव्हाण साहेबांचे सर्वांनी आभार मानले.