
जमीन मोजणार असाल तर भरमसाठ फी मोजायची तयारी ठेवा.
राज्यात ग्रामीण भागातील क्षेत्राची मोजणी करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी यापूर्वी एक हजार रुपये फी घेतली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती दोन हजार रुपये करण्यात आली आहे. या पुढील दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी एक हजार रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत द्रूतगती (अतितातडीने) मोजणीसाठी यापूर्वी तीन हजार रुपये फी घेतली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आठ हजार रुपये करण्यात आली आहे. या पुढील प्रत्येकी दोन हेक्टरपर्यंत द्रूतगती (अतितातडीची) मोजणीसाठी चार हजार रुपये फी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात शहरी भागातील (महानगरपालिका/नगरपालिका हद्दीतील) क्षेत्राची मोजणी करण्यासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी यापूर्वी दोन हजार रुपये फी घेतली जात होती. त्यामध्ये वाढ करून तीन हजार रुपये करण्यात आली आहे.या पुढील एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी १,५०० रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. एक हेक्टरपर्यंत द्रूतगती (अतितातडी) मोजणीसाठी यापूर्वी सहा हजार रुपये फी घेतली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती १२ हजार रुपये करण्यात आली आहे. या पुढील प्रत्येकी एक हेक्टरपर्यंत द्रूतगती (अतितातडी) मोजणीसाठी सहा हजार रुपये फी निश्चित करण्यात आली आहे.
कंपन्या, इतर संस्था, विविध प्राधिकरणे, महामंडळे, व भूसंपादन संयुक्त मोजणीसाठी शहरी भागातील (महानगरपालिका/नगरपालिका हद्दीतील) क्षेत्राच्या मोजणी फीप्रमाणे फी आकारणी करण्यात येणार आहे.www.konkantoday.com