
गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांतचा मृतदेह सापडला.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथील गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांत चा शोध सोमवारी घटना घडल्यापासून युद्धपातळीवर सुरु असताना तब्ब्ल 36 ते 40 तासानंतर आज बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह याच नदीपात्रात तो ज्या जागी बुडाला तेथून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळून आला.प्रशांत प्रभाकर भागवत (वय वर्ष 21) हा त्याची काकी प्रतीक्षा यादव ही कपडे धुवण्यासाठी येथील गडनदीवर गेली होती तिच्या बरोबर नदीत अंघोळ करण्यासाठी गेला होता. याचवेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्लास्टिक टफ वाहून गेला तो पकडण्यासाठी प्रशांत याने पाण्यात उडी घातली मात्र तो पुन्हा वर आलाच नाही. ही घटना 2 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली होती.




