
कोकण रेल्वे स्थानकांवर लवकरच दर्जेदार ब्रँडेड खाद्यपदार्थ उपलब्ध होणार.
कोकण रेल्वेने आजवर प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यावरच भर दिला आहे. यामुळे प्रवाशांची सर्वाधिक पसंती कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांना मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीसह उद्योजकतेला सहाय्य करण्यासाठी कोकण रेल्वेने प्रोप्रायटर आर्टिकल डेपो अंतर्गतच्या (पॅड) उत्पादनांसाठी मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना आता आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. विक्रीसाठी मंजूर वस्तूच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत.
प्रवाशांची सुविधा अन दर्जेदार सेवा सुनिश्चित करणे, हा कोकण रेल्वेच्या कामकाजाचा प्रमुख गाभा आहे. प्रवाशांची प्रवेश योग्यता वाढवण्यासाठी कोकण रेल्वेने नवनवे बदलही अंमलात आणले आहेत. याद्वारे प्रवाशांना विश्वासार्ह सवा देत प्रवाशांची पसंती अधिक दृढ करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने त्या त्या स्थानकांवर दर्जेदार ब्रँडेड पॅकेज केलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.
प्रोप्रायटरी आर्टिकल डेपोला मंजुरी देत या श्रेणी अंतर्गत उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये बिस्किटे, चॉकलेटस, केक, आईस्क्रिम, चिप्स, नमकीन, एरेटेड ड्रिंक्स, फळांचे रस यासह रोजच्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. www.konkantoday.com




