कोकणात सुमारे ५०० कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार तर भारतीय वन्यजीव संस्थान’कडून (डब्लूआयआय) संपूर्ण देशात सागरी कासवांच्या गणनेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात कोकणात सुमारे ५०० कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार असल्याची माहिती डब्लूआयआयकडून देण्यात आली.कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीb byर्घकालीन नोंद ठेवण्यामध्ये मदत मिळणार आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. तर काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवेदेखील अंडी घालतात. वनविभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओईएफ) मंत्रालयाच्या ‘व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास’ (आयडीडब्लूएच) या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा, २०२१-२६’ या आरखड्यातील तरतुदीनुसार ‘डब्लूडब्लूआय’मार्फत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे.[04/12, 5:02 PM] Sudesh Sir: *महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा*______________मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालेसत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहेत. तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते ही हजेरी लावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button