
कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची दीपक नागले यांची मागणी.
कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. रहिवासी दाखल्यामुळे संबंधित उमेदवार स्थानिक आहेत की नाही हे समोर येते. मात्र काही परप्रांतीय उमेदवार स्थानिक दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त असून अशा वृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करताना रहिवासी दाखल्याचीही तपासणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी केली आहे.www.konkantoday.com