
माजी आमदार वैभव नाईक यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करणार नाहीत.
माजी आमदार वैभव नाईक यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यांचं कारणंही नाईक यांनी सांगितलं आहे.शिंदे गटाच्या निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा 8,176 मतांनी पराभव केला. निलेश राणे यांना 81,659 तर वैभव नाईक यांना 73,483 मते मिळाली. पण, नाईक यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करणार नसल्याचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.”माझा पराभव मी स्वीकारला आहे.
‘ईव्हीएम’च्या फेरमतमोजणीसाठी महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांनी पैसे भरले आहेत. मात्र, मी एकही रूपया भरला नाही. कारण, पराभव स्वीकारला पाहिजे. कोणतीही कारणे सांगता कामा नये. ‘जो जिता वही सिंकदर’ यातून काम केले पाहिजे. झालेल्या पराभवाबद्दल बोलायचं नाही. आपल्याला पुढे काम करायचं आहे,” असं म्हणत नाईक यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.