दगडी कोळशाने भरलेलल्या 14 चाकी ट्रकला अचानक आग
. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील दाभोळे घाटात रविवारी सायंकाळी सुमारे 4.50 च्या दरम्यान दगडी कोळशाने भरलेलल्या 14 चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही बाब देवरुख नगर पंचायतीला समजताच अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
रत्नागिरी – कोल्हापूर मार्गावरून दगडी कोळसा घिऊन के. ए. 28 डी 7224 हा ट्रक निघाला होता. दाभोळे येथे या ट्रकचा अपघात झाला होता. या ट्रकमध्ये 30 टन दगडी कोळसा होता. रविवारी सायंकाळी सुमारे 4.50 वा. च्या दरम्यान या अपघात झालेल्या ट्रकला अचानक आग लागली.या आगीची माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेकडून देवरुख नगर पंचायतीला प्राप्त होताच नगर पंचायतीचे अग्निशमन दल अग्निशमन वाहनासहीत घटनास्थळी तातडीने पोहचले.
घटनास्थळी पोहोचताच कर्मचारी वर्गाने आग नियंत्रणात आणण्यास विझवण्यास सुरुवात केली. अर्धा ते पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर ट्रकची आग पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश प्राप्त झाले.