चेकअपसाठी आलो होतो.. प्रकृती उत्तम.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नसल्याने ते मंगळवार (दि.3) आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले होते.त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले.एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या घशात संसर्ग झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत .