किसान मोर्चाच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने पीक विमा योजनेची तारीख वाढविली.
कोकणातील शेतकर्यांना अजूनही विमा परतावा मिळालेला नाही. त्यात कोकणच्या पिक विम्याचे निकष हे येथील परिस्थितीचा अभ्यास न करता करण्यात आले आहेत. त्यासोबत विमा परतावा न देता विमा भरण्याची तारीखसुद्धा ३० नोव्हेंबर केली होती. आचारसंहिता आणि त्यात नवीन सरकार अस्तित्वात येत नाही तोवर प्रशासन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणार होते. किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पोतकर यांच्या पुढाकाराने प्रशासनाने पीक विमा योजनेची तारीख वाढवून १५ डिसेंबर केली आहे. www.konkantoday.com