ओणी आणि वाडीलिंबू पाठोपाठ प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर आणि राजापूरला मिळणार रुग्णवाहिका …
*राजापूर तालुक्यात दोन दिवसात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार रुग्णवाहिका: किरण सामंत
लांजा – राजापूर – साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आपल्या स्वतःच्या माध्यमातून लांजा राजापूर साखरपा मतदार संघामध्ये ७ रुग्णवाहिका दिल्या. तसेच शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र ओणि ता. राजापूर व वाडीलिंबू ता. लांजा येथे रूग्णवाहिका येत्या दोन दिवसात उपलब्ध होत आहेत व सेवेत दाखल होत आहेत. मात्र ते तेवढ्यावरच न थांबता राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर आणि राजापूर या दोन आरोग्य केंद्रांमध्ये किरण सामंत यांच्या पाठपुराव्या नंतर दोन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
किरण सामंत यांनी आरोग्य क्षेत्रात कामाला सुरुवात केली असून ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एक पाऊल पुढे येऊन जनतेची सेवा करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातून त्यांनी सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. किरण सामंत यांच्या या कार्याला प्रत्येक मतदारांनी कौतुक करत आम्ही दिलेले मत हे योग्य माणसाला दिले असल्याचेही भावना यावेळेस व्यक्त केली. ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्य सेवा मिळावी त्यांना वेळेत औषधोपचार व्हावेत या उद्देशाने किरण सामंत यांनी ही वाटचाल सुरू केली आहे त्यांच्या या पाठपुराव्याला यशआले असून येथील जनतेसाठी रुग्णवाहीकेच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध केली जाणार असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले आहे.