आरवली – गुरववाडी येथील गडनदी पात्रात तरुण बुडून बेपत्ता
नदीपात्रात गेलेला प्लास्टिकचा टब काढण्यासाठी गेलेला तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल, साेमवारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली – गुरववाडी येथील गडनदी पात्रात घडली. प्रशांत प्रभाकर भागवत (वय २१, रा.रांबाडे चाळ, खेरशेत, ता. चिपळूण) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, अद्यापही त्याचा शाेध लागलेला नाही.प्रशांत भागवत याची काकी प्रतीक्षा प्रदीप यादव या साेमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान गडनदी पात्रात कपडे धुवण्यासाठी गेल्या हाेत्या. त्यांच्यासाेबत प्रशांतही आंघाेळीसाठी गेला हाेता. दरम्यान, कपडे ठेवण्यासाठी नेलेला प्लास्टिकचा टब नदीपात्रातील पाण्यातून वाहून गेला. ताे पकडण्यासाठी प्रशांत याने नदीपात्राच्या पाण्यात उडी मारली. मात्र, त्यानंतर ताे पुन्हा बाहेर आलाच नाही.