रस्ता रुंदीकरणातील चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली.

मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता.मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने ही बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.सोमवारी यापैकी चंपक मैदान ते साळवी स्टाॅप यादरम्यानची ८ बांधकामे पोलिस संरक्षणात हटविण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button