देवबाग किनार्यावर सीगल पक्ष्यांचे थवे दाखल.
देवबाग किनार्यावर तर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागल्याने पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. सीगलचे हे लक्षवेधी तितकेच नेत्रदीपक दृश्य पाहून पर्यटक भारावून जात आहेत.1 सप्टेंबरपासून कोकणातील पर्यटन हंगाम सुरू होतो; मात्र दिवाळीला मुलांना शाळेत सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवाळीत अधिक वाढते, ती संख्या पुढे कमी अधिक प्रमाणात वाढतच राहते. नोव्हेंबर अखेर थंडीला सुरुवात झाल्यानंतर परदेशातील विविध पक्षी किनारपट्टीवर हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. या पक्षांचे थवे लक्षवेधी तर असतातच पण त्या थव्याचे चित्र डोळ्याचे पारणे फेडणारे असेच असते; त्यामुळे कोकण किनारपट्टीवर अनेक पर्यटक प्रतिवर्षी आवर्जून उपस्थिती दर्शवितात. सद्यस्थितीत हजार किलोमीटरवरून सीगल पक्षी हजारोंच्या संख्येने किनारपट्टीवर दाखल झाले