संगमेश्वर रेल्वे स्थानकात तीन गाडयांना ३१ डिसेंबर पर्यंत थांबा न दिल्यास येत्या २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा निसर्गरम्य चिपळूण/संगमेश्वर ग्रुपचा इशारा संदेश जिमन
मुंबई:- गेल्या 24 जुलै रोजी संयुक्त बैठकीत तीन गाड्यांच्या थांब्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने 5 महिन्यात मागणी पूर्ण न केल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिला आहे.
श्री जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला तसें निवेदन दिले असून आता महिनाभरात मागणी पूर्ण न झाल्यास थांब्यासाठीचा संघर्ष तीव्र करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला.
निवडणूक आचारसंहिता असल्याने आपण एवढे दिवस शांत होतो परंतु कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या मागणी ला गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
संगमेश्वर चिपळूण चे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेल्या संयुक्त बैठकीत कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोषकुमार झा यांनी या मागणी कडे व्यक्तीगत लक्ष् घालण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासानावर विश्वास ठेवून आम्ही 15 ऑगस्ट रोजी होणारे उपोषण स्थगित केले होते परंतु बैठकीला आता 5 महिने होतं आले तरीही कोकण रेल्वे प्रशासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही..
दरम्यान च्या काळात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून या मागणीचे निवेदन दिले होते.त्यामुळे आता शेवटचे निवेदन देऊन मागणी पूर्ण होतं नसेल तर बेमुदत उपोषणा शिवाय पर्याय उरणार नाही. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या रेल्वे विषयीच्या भावना तीव्र असून आमच्या उपोषणात जनताही उस्फुर्तपणे भाग घेईल असा विश्वास ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केला.%