विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आणि ज्येष्ठ माध्यम सल्लागार श्री. जयू भाटकर यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट.
राजभवन येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्ण यांची, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहायक संचालक व ज्येष्ठ माध्यम सल्लागार श्री. जयू भाटकर यांनी सदिच्छा भेट घेतली.