राज्य परिवहन महामंडळाकडून आता शिवशाहीला ब्रेक लावला जाणार.

आता राज्य परिवहन महामंडळाकडून आता शिवशाहीला ब्रेक लावला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एसटी प्रशासनाकडून शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बसमधील तांत्रिक दोष समोर आल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं समजते. शिवशाही बस बंद करून या बसेसचं रुपांतर लालपरीत होणार आहे.शिवशाही बसमध्ये असलेल्या तांत्रिक दोषांकडे याआधी एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं. पण शिवशाही बसचे वाढते अपघात आणि तक्रारींमुळे शेवटी शिवशाही बस सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे.

यांत्रिक विभागाकडूनही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनीदिलीय. एसटी सेवेतून शिवशाही महिन्याभरात बंद होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ८९२ शिवशाही बसेस असून ५०० बस रस्त्यावर धावत आहेत. तर ३९२ बस या वर्कशॉपमध्ये आहेत.शिवशाहीची सेवा बंद केल्यानंतर तिचं रुपांतर साध्या बसमध्ये केलं जाणार आहे. बसमधील अंतर्गत आणि बाह्य भागात बदल केले जातील. काचा काढल्या जातील, सीटच्या रचनेत बदल केला जाईल. तसंच चालकांनी शिवशाहीबद्दल केलेल्या तक्रारींनुसार अडचणी दूर केल्या जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button