
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरतीतीची सखोल चौकशी करून त्या उमेदवारांना अपात्र करा.
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरतीत अनेक परजिल्ह्यातील उमेदवार बोगस दाखले मिळवून यादीत पात्र असल्याची बाब जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. धारक उमेदवार संघटनेकडून करण्यात आली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून त्या उमेदवारांना अपात्र करावे, अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. असे बोगस दाखले मिळवून पात्र ठरलेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करून त्यांना अपात्र करावे, यासाठी जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. धारक एकवटले आहेत. अनेक ठिकाणी गटशिक्षणाधिकार्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंत्राटी शिक्षक भरती ही स्थानिकांसाठी असतानाही यात बोगस दाखले मिळवून अनेक परजिल्ह्यातील उमेदवार नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा नियुक्त्या झाल्यास जिल्हा डी.एड., बी.एड. संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल वेळीच घ्यावी अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com